ठळक बातम्या

खा. कलाबेन डेलकर उद्धव ठाकरेंच्या भेटीला

मुंबई – दादरा-नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपला धूळ चारली आहे. या शानदार विजयानंतर विजयी उमेदवार कलाबेन डेलकर आणि त्यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आम्ही ही लढाई जिंकली आहे, माझे वडील मोहन डेलकर हे हुकूमशाहीच्या विरोधात होते. ही तर सुरुवात आहे, असे म्हणत अभिनव डेलकर यांनी भाजपवर निशाणा साधला.
दादरा-नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवराचा दारुण पराभव करत शिवसेनेचा भगवा फडकवणाऱ्या कलाबेन डेलकर यांनी बुधवारी संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्राबाहेर पहिला खासदार निवडून आल्यामुळे शिवसेनेत उत्साह संचारला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत ‘वर्षा’ निवास्थानी शिवसेनेने विजयी जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत हे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर कलाबेन डेलकर आणि अभिनव डेलकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
दादरा-नगर-हवेलीमध्ये जनतेने आशीर्वाद दिला आहे. आम्हाला जेवढी अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त यश मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देण्यासाठी आलो होतो. मुख्यमंत्री लवकरच दादरा-नगर-हवेलीत विजयी सभा घेण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती कलाबेन डेलकर यांनी दिली. तर, हा एक ऐतिहासिक व लोकशाहीचा विजय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमच्यासोबत आहेत. भाजपचे बडे नेते प्रचारासाठी आले होते, परंतु हा प्रदेशाचा प्रश्न होता. आम्हाला ३०-३५ हजार मतांनी विजयी होण्याची अपेक्षा होती. इतक्या मोठ्या विजयाची अपेक्षा नव्हती, असे अभिनव डेलकर म्हणाले. तसेच, आता आमच्यामागे २२ शिवसेना खासदारांची ताकद मिळेल. हुकूमशाहीच्या विरोधात माझे वडील होते. ही तर सुरुवात आहे. गुजरातमध्ये व दमणमध्येही पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही अभिनव डेलकर यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …