खासगी रुग्णालयांसाठी बीएमसीच्या नव्या गाइडलाइन्स

कोरोना बाधितांना परवानगीशिवाय भरती करण्यास मना
मुंबई – दुसऱ्या लाटेप्रमाणे आताही मुंबईतल्या खासगी रुग्णालयात भरती होण्यासाठी कोविड रुग्णांना मुंबई महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. तशा सूचना मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळे बेडची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने पावले उचलायला सुरुवात केली आहे. खासगी रुग्णालयांना ८० टक्के कोविड बेड्सची उपलब्धता ठेवण्यास सांगण्यात आले आहे, तसेच सरकारने निर्देशित केलेले दर आकारणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे. मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यानं महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी दुसऱ्या लाटेप्रमाणेच पालिकेच्या परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णाला दाखल करू नका, अशा सक्त सूचना प्रशासनाने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. यासाठी पालिकेने नुकतीच खासगी रुग्णालयांसाठी नियमावलीही जारी केली आहे, तसेच बेड्स वाढवण्यासोबत रुग्णांसाठी आयसीयू वॉर्ड सज्ज ठेवावेत, अशा सूचनाही पालिकेने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …