क्रूझ ड्रग्ज पार्टी : किरण गोसावी पुन्हा पसार; यूपीतही पुणे पोलिसांना गुंगारा

लखनऊ/पुणे – क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात वादग्रस्त असलेल्या किरण गोसावीने पुणे पोलिसांना उत्तर प्रदेशमध्येही गुंगारा दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे पोलिसांच्या दोन पथकांकडून सध्या किरण गोसावीचा उत्तर प्रदेशमध्ये तपास सुरू आहे. गोसावीचे शेवटचे लोकेशन यूपीतल्या फ त्तेहपूरमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. किरण गोसावी सध्या उत्तर प्रदेशमध्ये असून, तो सातत्याने त्याचे लोकेशन बदलत आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान त्याचे शेवटचे लोकेशन हे फत्तेहपूर असल्याची माहिती आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावीने आर्यन खानला सोडवायच्या बदल्यात शाहरूख खानकडून २५ कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केला आहे, तसेच किरण गोसावीवर पुण्यामध्ये गुन्हे नोंद असून, त्याप्रकरणी पुणे पोलीस त्याच्या शोधात आहेत. पुणे पोलिसांची दोन पथके लखनऊला गेली आहेत. गळ्यात सोन्याच्या माळा, हातात पिस्तुल आणि एनसीबीचा अधिकारीच असल्याच्या अविर्भावात वावरणाऱ्या किरण गोसावीने उत्तर प्रदेश पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याची तयारी दर्शवली होती, पण शरणागतीसाठी लखनऊला गेलेल्या किरण गोसावीला ताब्यात घेण्यास स्थानिक पोलिसांनी नकार दिला, तर गोसावीला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलीस लखनऊला पोहोचले. पण गोसावी तिथूनही पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …