कोविड खर्चाची श्वेतपत्रिका काढा – भाजप

मुंबई – मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या या खर्चाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी भाजपकडून स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली, तर कोविडच्या नावाने केल्या जाणाऱ्या खर्चाचे ऑडिट करावे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. यावर कोविडच्या नावाने करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील सादर करावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने कोविड सेंटर उभारले आहेत. त्यापैकी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कोविड सेंटरसाठी करण्यात आलेल्या ७७ आणि ५२ कोटींच्या खर्चाचे दोन प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. पालिकेने १२७ कोटी रुपये खर्च करताना त्याचा तपशीलवार अहवाल दिलेला नाही. हा तपशील दिला जात नसल्याने नेमका खर्च कशावर होतो आहे? हे कळत नसल्याने कोविडवर होणाऱ्या खर्चाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published.