डॉ. सुरेश जाधव यांचे निधन
पुणे – सीरम इन्स्टट्यिूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले आहे. डॉ. सुरेश जाधव हे निधनसमयी ७२ वर्षांचे होते. सीरम इन्स्टट्यिूटकडून कोरोनावरील कोव्हिशील्ड लस तयार करण्यात डॉ. जाधव यांचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. बुधवारी पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. डॉ. जाधव यांच्या जाण्याने भारतीय वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. सुरेश जाधव यांनी कोरोनाविरोधी लसीच्या संशोधनात मोलाचे योगदान दिले, तसेच सीरम इन्स्टट्यिूटची कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशील्ड तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. जाधव हे बुलढाण्यासारख्या छोट्या गावातून पुण्यात आले. त्यांनी भारतातील लस संशोधनात योगदान दिले, तसेच आपल्या कामातून त्यांनी जागतिक स्तरावर स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. त्यामुळे त्यांना भारतीय लस संशोधनातील भिष्माचार्य म्हटले जाते. त्यांच्या नावावर जगभरातील अनेक पेटंट आहेत. डॉ. जाधव यांच्या जाण्यामुळे भारतीय वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना औषध निर्माण क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …