केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांना कोरोना

मुंबई – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यानंतर त्यांनी स्वत:ची चाचणी करून घेतली. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले असून, त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात येत आहेत. खुद्द डॉ. भारती पवार यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे भारती पवार यांनी बुधवारीच मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात कोरोना प्रसाराबाबत आढावा बैठक घेतली होती.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पुणे तसेच मुंबईसारख्या मोठ्या शहरात अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत देशातील नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण होत आहे. मागील काही दिवसांपासून मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर आदी नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आता थेट केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी तत्काळ कोरोना प्रतिबंधक चाचणी करून घ्यावी, असे आवाहन भारती पवार यांनी केले आहे.
दरम्यान, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. गोडसे यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईला जाऊन आल्यानंतर सर्दी, खोकला आणि ताप आल्यानंतर हेमंत गोडसे यांनी चाचणी केली होती. हेमंत गोडसे यांना यापूर्वी देखील कोरोना झाला होता. संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन हेमंत गोडसे यांनी केलेआहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …