ठळक बातम्या

केंद्रात मोदींचे सुशासन, तर राज्यात ठाकरेंचे कुशासन – प्रकाश जावडेकरांचा हल्लाबोल

नाशिक – केंद्रामध्ये मोदी सरकारचे सुशासन आहे, तर राज्यात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचे कुशासन सुरू आहे, असा गंभीर आरोप माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी केला. ते नाशिकमध्ये आले असता बोलत होते. राज्यात पोलीसच बॉम्ब पेरत आहेत. सरकार वसुली करण्यात गुंतले आहे, अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात भारतीय जनता पक्षाने सुशासन दिन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
प्रकाश जावडेकर म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारचे अटलबिहारी वाजपेयी यांनी रचलेल्या पायावर काम सुरू आहे. हे सुशासन आहे. महाराष्ट्रात मात्र दुशासन आणि कुशासन कार्यरत आहे. नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदार पोलिसांच्या शिरावर असते. ते बॉम्ब पेरणाऱ्या दहशतवाद्यांना बेड्या ठोकतात, मात्र राज्यात पोलीसच बॉम्ब पेरण्यात गुंतले आहेत. त्यांनीच खून केले आहेत. स्वत:वरील खटल्यावरून लक्ष हटवण्यासाठी मंत्री गुंतले आहेत. हे कुशासन आहे, अशा शब्दांत जावडेकरांनी यावेळी हल्लाबोल केला.
नाशिकमध्ये सातपूर येथील भाजप मंडळाध्यक्ष अमोल इघे यांचा निर्घृण खून झाला. यावरून भाजपने राळ उठवली आहे. याप्रकरणीही जावडेकरांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, इघे यांचा राजकीय खून झाला. भाजपला कोणत्याही मार्गाने रोखता येत नाही. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना असे संपवले जात आहे. या प्रकरणामागे महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रात जनतेचा कौल भाजपच्या पारड्यात होता, मात्र तो शिवसेनेने नाकारला. मोदी विरोधकांशी हातमिळवणी केली. त्यामुळे राज्यात एकही गोष्ट योग्य घडत नाही, हे सांगायला जावडेकर विसरले नाहीत. कार्यक्रमाला महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सीमा हिरे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरी पालवे, माजी शहराध्यक्ष विजय साने उपस्थित होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment

  1. Pingback: Web Hosting