ठळक बातम्या

केंद्राकडून नवी ऑर्डर नाही, सीरम लसीचे उत्पादन ५० टक्के घटवणार

पुणे – सीरम इन्स्टट्यिूट ऑफ इंडियाने पुढील आठवड्यापासून कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही ऑर्डर नसल्याचेही सीरमकडून सांगण्यात आले आहे. मागणी पेक्षा उत्पादन जास्त असल्याने कोव्हिशिल्ड लसीची निर्मिती कमी प्रमाणात करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. आमच्याकडे केंद्र सरकारने नोंदवलेल्या ऑर्डर्स पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण करणार असल्याचेही सीरमकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनीने केंद्र सरकारला पत्र लिहून किती प्रमाणात लसी हव्या आहेत, यासंदर्भात माहिती हवी असल्याचे कळवले आहे.
सीरम इन्स्टट्यिूट ऑफ इंडिया महिन्याला २५ ते २७ कोटी डोसची निर्मिती करते. सुरुवातीला कंपनी महिन्याला १० ते ११ कोटी डोस बनवत होती. नोव्हेंबरपासून जागतिक आरोग्य संघटनेच्या कोव्हॅक्स मोहिमेअंतर्गत कोव्हिशिल्ड लसीची निर्मिती करण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने लसींची मागणी नोंदवली नाही, तर आम्ही लसीचे डोस निर्यात करणार असल्याचे सीरमने यापूर्वीच जाहीर केले आहे. आम्ही सरकारसोबत चर्चा करीत आहोत. येत्या काही दिवसांत त्यासंदर्भातील माहिती मिळेल. सीरमकडे ५० कोटी डोस आहेत. हे डोस पुढील दोन महिन्यांत वापरले जातील. यामध्ये भारत सरकारला प्राधान्य दिले जाईल, असेदेखील सांगण्यात आले आहे. सध्या कोव्हिशिल्ड लसीची निर्यात कमी प्रमाणात होत आहे. पुढील आठवड्यात आम्हाला लसीसाठी ऑर्डर मिळेल. गेल्या आठ महिन्यांत आम्ही निर्यात केलेली नाही, असे देखील सीरमकडून सांगण्यात आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …