ठळक बातम्या

कुर्ल्यातील तरुणीच्या हत्येप्रकरणी प्रियकर ताब्यात

मुंबई – मुंबईतील कुर्ला येथील तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. तरुणीचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लग्नाचा तगादा लावल्यामुळे प्रियकराने मित्राच्या मदतीने तिची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले, मात्र मी बलात्कार केलाच नाही, असा दावा आरोपी प्रियकराने प्राथमिक चौकशीत केला आहे.
मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील एचडीआयएल कम्पाऊंडमधील एका रिकाम्या इमारतीच्या छतावर गुरुवारी २३ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता. बलात्कार करून तिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा संशय होता. इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ शूट करण्यासाठी गेलेल्या काही तरुणांना या युवतीचा मृतदेह सर्वप्रथम आढळला होता. या तरुणीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारावर मृत तरुणीचा प्रियकर रेहान शेख (२०) आणि त्याचा मित्र फैजल शेख (२०) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
तरुणीने लग्नासाठी आरोपीच्या मागे तगादा लावला होता, पण त्याला तिच्याशी लग्न करायचे नसल्यामुळे त्याने मित्र फैजलच्या मदतीने तिची हत्या केली, असे चौकशीत समोर आले. प्राथमिक चौकशीत आरोपीने हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार केला नसल्याचे पोलिसांना सांगितले होते, पण पोलीस त्याबाबत अधिक चौकशी करीत आहेत. कुर्ल्याच्या एचडीआयएल कम्पाऊंडमधील ही इमारत बंद असते, मात्र १८ वर्षांचा एक तरुण आपल्या दोन मित्रांसह इन्स्टाग्राम रील व्हिडीओ शूट करण्यासाठी या इमारतीमध्ये गेला होता. त्यावेळी त्याने सर्वात आधी तरुणीचा मृतदेह पाहिल्याची माहिती आहे. तरुणाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सर्वप्रथम या प्रकाराची माहिती दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …