ठळक बातम्या

किरीट सोमय्यांविरोधात काँग्रेस गुन्हा दाखल करणार

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती
बुलढाणा – मागील अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीला लक्ष्य करीत आहेत. याआधी सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेते यांच्यावरदेखील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. सोमय्या यांच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या आरोपानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. आता काँग्रेस किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तशी माहिती दिली आहे. सध्या सोमय्या यांनी बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये (मल्टिस्टेट) मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या बँकेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी ५३.७२ कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
किरीट सोमय्या यांनी कितीही आरोप केले, तरी काहीही फरक पडत नाही. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. सोमवारी काँग्रेस पक्ष भाजप नेते किरीट सोमय्यांवर गुन्हे दाखल करणार आहे, असे नाना पटोले म्हणाले. मागील अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर वेगवेगळे आरोप करीत आहेत. शिवसेना खासदार भावना गवळी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच अन्य बड्या नेत्यांवर त्यांनी वेगवेगळे आरोप केले आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी बँका, साखर कारखाने तसेच अन्य खाजगी कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केले आहेत, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर यातील बऱ्याच मंत्र्यांविरोधात वेगवेगळ्या तपास संस्थांनी कारवाई केली. ईडी, सीबीआय, एनआयए, आयकर विभाग अशा संस्थांनी सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर चौकशी सुरू केली आहे. बरेच मंत्री चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक तसेच निटकवर्तीय यांचादेखील समावेश आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …