ठळक बातम्या

किरण गोसावीविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल; आणखी काही तक्रारी येण्याची शक्यता

पुणे – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावी (३७, रा. वाशी) याच्याविरुद्ध फसवणुकीचा तिसरा गुन्हा वानवडी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून, अन्य काही जणांनीही त्याच्याविरुद्ध तक्रार अर्ज दिले आहेत. यापूर्वी फरासखाना व लष्कर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
विदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने गोसावी याने कसबा पेठेतील चिन्मय देशमुख या तरुणाची तीन लाख रुपयांची फसवणूक केली. त्याबाबत तीन वर्षांपूर्वी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणात फरारी असलेला गोसावी याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी कात्रज परिसरात अटक केली. त्यानंतर शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) याच स्वरूपाचा गुन्हा त्याच्याविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यातही दाखल करण्यात आला. त्याबाबत शिवराज रामचंद्र जमादार (रा. उरुळी देवाची) यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार, गोसावी व कुसुम गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जमादार व त्याचे मित्र अनिल पवार, अभिमन्यू जाधव यांना मलेशियामध्ये मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून गोसावी व गायकवाड यांनी त्यांच्याकडून चार लाख रुपये उकळले. प्रत्यक्षात त्यांना विमानाची बनावट तिकिटे दिली, तसेच कोणतीही नोकरी न लावता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ वानवडी पोलीस ठाण्यात गोसावी व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मलेशियामध्ये नोकरीला लावण्याच्या बहाण्याने गोसावीने एका तरुणाकडून दीड लाख रुपये उकळले. प्रत्यक्षात त्याला नोकरी न देता फसवणूक केली. आपले पैसे मागण्यासाठी हा तरुण गोसावी याच्या वाशी येथील कार्यलायात गेला होता. त्यावेळी पिस्तुलाचा धाक दाखवून त्याने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत जाधव याप्रकरणी तपास करीत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …