ठळक बातम्या

कामावर उशिरा आल्याने अल्पवयीन मोलकरणीला विवस्त्र करून मारहाण; मुंबईतील धक्कादायक घटना

नग्न व्हिडीओही काढला
मुंबई – कामावर उशिरा आली म्हणून अल्पवयीन मोलकरणीला विवस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना पश्चिम उपनगरातील अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा भागात घडली आहे. या मारहाणीत अल्पवयीन मोलकरणीच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या भावाने सदर मालकिणीविरोधात वर्सोवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित १७ वर्षाय मुलगी वर्सोवा परिसरात घरकाम करते. पीडिता नेहमीप्रमाणे ६ डिसेंबर रोजी घरकामासाठी सदर घरी गेली, मात्र त्या दिवशी कामावर पोहोचायला तिला थोडा उशीर झाला होता. यामुळे घरमालकीण तिच्यावर रागावली होती. पीडित मुलगी कामासाठी घरी येताच रागाने लाल झालेल्या घरमालकिणीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. घरमालकिणीने आधी तिला गंभीररित्या मारहाण केली. त्यानंतर तिला विवस्त्र केले. एवढ्यावरच मालकिणीचा अमानुषपणा थांबला नाही. पीडितेला विवस्त्र केल्यानंतर तिने पीडितेच्याच मोबाइलमध्ये तिचा नग्न व्हिडीओ काढला, तसेच नग्न फोटोही काढले. त्यानंतर तिला चपलीने जबर मारहाण करीत अर्धमेले केले.
या मारहाणीमुळे अल्पवयीन पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पीडितेला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडितेच्या भावाने वर्सोवा पोलीस ठाणे गाठत सदर घरमालकिणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बाल संरक्षण अधिनियमानुसार मारहाण, छेडछाड, अपमान आणि बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment