काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला बेवकूफ बनवू नये – इम्तियाज जलील

औरंगाबाद – केंद्र सरकार जोपर्यंत आरक्षणासाठीचा कोटा वाढवत नाही, तोपर्यंत मुस्लीम समाजाला आरक्षण देणे कठीण आहे, असे वक्तव्य राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले. मलिक यांच्या या वक्तव्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कडाडून टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आधी मुस्लिमांना बेवकूफ बनवणे सोडून द्यावे. सरकारने मनात आणले तर ते एका दिवसात आरक्षण देऊ शकतात, पण त्यांची तशी नियतच नाही, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.
नवाब मलिक यांनी आरक्षणातील अडचण सांगितल्यावर इम्तियाज जलील म्हणाले, ‘सरकारने मनात आणले, तर मुस्लीम समाजाला एका दिवसात आरक्षण देऊ शकतात, मात्र आरक्षण देण्याची त्यांची नियत नाही. घटना दुरुस्तीचे कारण देऊन ते खोटे बोलत आहेत. हे जेव्हा विरोधी पक्षात होते आणि मुस्लीम समाजाला आरक्षण द्या म्हणून हे जोरजोरात ओरडत होते त्या वेळेला त्यांना घटनादुरुस्तीचा अडथळा समजला नाही का? आम्ही दबाव निर्माण केल्यामुळे आरक्षण देण्यासंदर्भात या हालचाली निर्माण झालेल्या आहेत, या सरकारने तातडीने अध्यादेश आणून हे आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला. मुस्लीम आरक्षणावरून मलिक यांनी केंद्राकडे बोट दाखवल्यानंतर इम्तियाज जलील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना आम्ही मूर्ख आहोत, असे वाटतेय की काय? २०१४ मध्ये जेव्हा आरक्षणासंबंधी अध्यादेश आणला होता, तेव्हासुद्धा ५० टक्क्यांच्या मर्यादेचा नियम होताच. तेव्हा कसे शक्य होईल असे वाटले, असा सवाल जलील यांनी केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …