करवा चौथच्या दिवशीच विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

दीर-नवऱ्याने हत्या केल्याचा आईचा आरोप
अकोला – करवा चौथच्या दिवशी उत्तर भारतीय समाजातील महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर कडक उपवास ठेवतात; मात्र याच दिवशी महाराष्ट्रात एका उत्तर भारतीय महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आपले आयुष्य संपवले. याप्रकरणी तिच्या पती आणि दीरावर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. ही आत्महत्या होती की हत्या, यावरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. महिलेने तिच्या मर्जीने उडी मारली, असे तिच्या सासरच्या मंडळींचे म्हणणे आहे, तर तिच्या पती आणि दीराने तिचा खून केल्याचा आरोप महिलेच्या आईने केला आहे.
सोनी शुक्ला नावाच्या विवाहितेने राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची उघडकीस आली. घटनेनंतर पोलीस आणि स्थानिक रहिवाशांनी जखमी विवाहितेला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या विवाहितेने पती आणि दीराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. या कारणावरून सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …