औरंगाबाद : मामेभाऊ जीवावर उठला; मोबाइलसाठी विहिरीत ढकलून कवटी फुटेपर्यंत दगडाने डोके ठेचले

औरंगाबाद – भावाला मोबाइल मिळाला, पण आपल्याला नाही मिळाला, याचा राग आल्याने औरंगाबादमध्ये एका अल्पवयीन मुलाने भावाला थेट विहिरीत ढकलले. विहिरीत पडलेल्या भावाने प्राण वाचवण्यासाठी दोरीला पकडले, पण तरीही राग शांत न झाल्याने काठावरील भावाने दगडाने त्याचे डोके ठेचून त्याला ठार मारले. येथील वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात केलेल्या या कृ त्याने शहरामध्ये खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ही दोन्ही मुले १७ वर्षांची असून, ते आते-मामे भाऊ आहेत. काही दिवसांपूर्वी आजोबांनी आतेभावाला मोबाइल घेऊन दिला, पण मामेभावाला हे खपत नव्हते. त्यानंतर त्याने आतेभावाचा खून करायचे ठरवले. आपण पार्टी करुया असे सांगत तो त्याला बिडकीन येथे घेऊन गेला. रस्त्यात ढोरकीनच्या रस्त्यावर त्यांनी बिर्याणी खाल्ली. त्या ठिकाणी एक विहिर होती. विहिरीवर आपण फोटो काढू असे म्हणत त्याला विहिरीजवळ नेले आधी स्वत:चा फोटो विहिरीजवळ काढला. त्यानंतर आतेभावाला विहिरीच्या काठावर उभे केले. मी फोटो काढतो म्हणाला आणि त्याला विहिरीत ढकलले. अचानकपणे धक्का दिल्याने सदर मुलगा विहिरीत पडला, पण त्याने विहिरीतील दोरीला घट्ट पकडून ठेवले. आपण ढकलून दिल्यावरही भाऊ पडलाच नाही, हे पाहून मामेभावाने दगडाने त्याचे डोके ठेचले. अखेर रक्तबंबाळ होऊन तो विहिरीत पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.
हा मुलगा बेपत्ता असल्याबाबत ३ डिसेंबरला पोलिसांत तक्रार झाली होती. ढोरकीन परिसरातील विहिरीत या मुलाचा मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. मृतदेहाची कवटी फुटल्याने हा घातपात असल्याचा पोलिसांना संशय आला, तसेच मोबाइलच्या लोकेशनवरून सीडीआर काढण्यात आले आणि तिथून पोलिसांना या गुन्ह्याची उकल झाली. चौकशीअंती मामेभावाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून, मोबाइल मिळाल्याच्या रागातूनच त्याने हे कृ त्य केल्याचे उघड झाले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …