औरंगाबादेत सापडले ब्रिटिशकालीन घबाड

औरंगाबाद – शहरातील सिडको परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम सुरू आहे. या स्मारकाच्या संरक्षण भिंतीसाठीच्या खोदकामात सव्वाशे वर्षांपूर्वीची नाणी आढळून आली आहेत. तब्बल दोन किलो वजनाची ही नाणी ब्रिटिशकालीन असून, त्यावर व्हिक्टोरिया राणीचा मुकूट व मुद्रा आहेत. औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनाने ही नाणी पुरातत्व विभागाकडे सुपूर्द केली आहेत.
खोदकाम सुरू असताना एका कापडी पिशवीत ही नाणी सापडली. या पिशवीत आणि एका जीर्ण झालेल्या पिशवीत ही नाणी होती. त्यामुळे नाण्यांचा मातीशी काहीही संपर्क आला नाही आणि कोणतीही रासायनिक प्रक्रिया झाली नाही. सुरुवातीला ही नाणी तांब्याची असावीत अशी शंका आली. हे पडताळून पाहण्यासाठी ज्वेलर्सना बोलावण्यात आले. तपासणीत नाण्यांना अत्यंत उच्च प्रतीचा सोन्याचा मुलामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटिश काळातील सोन्याचा मुलामा इतका घट्ट होता की, खूप घासल्यानंतरही नाण्याचा रंग फिका पडत नसे. ही नाणी सव्वाशे वर्षांपूर्वीची असून, त्यावर व्हिक्टोरिया राणीचा मुकूट व मुद्रा आहेत. एकूण दोन किलो वजनाच्या या नाण्यांवर १८८१ चा स्पष्ट उल्लेख आढळतो.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या संरक्षण भिंतीचे काम रत्नगुरू एजन्सीला मिळाले आहे. पाठीमागील बाजूस जेसीबीने खड्डे खोदून त्यातील माती बाहेर काढत असताना सोमवारी संध्याकाळी अचानक नाण्यांचा खणखणाट झाला. पाहणी केली असता एका गाठोड्यात नाणी सापडली. काही नाणी खड्ड्यातही आढळून आली. कंत्राटदार रोहित स्वामी यांनी प्रभाग अभियंता व्ही. के. गोरे यांना ही माहिती दिली. त्यानंतर महानगरपालिका आणि पुरातत्व विभागातर्फे ही नाणी नेमकी कोणत्या काळातील आहेत? कशाची आहेत? यासंबंधी तपास केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …