ठळक बातम्या

औरंगाबादेतील शाळा १० डिसेंबरपासून सुरू होणार

औरंगाबाद – शहरातील पहिली ते चौथीच्या शाळा १० डिसेंबरपासून सुरू होतील, असा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात थैमान माजवले आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांनी खबरदारीच्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या शहरातील पहिली ते चौथीच्या शाळा आता १ डिसेंबरऐवजी १० डिसेंबर रोजी सुरू होतील, असे महानगरपालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
महापालिकेचे उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून शहरातील पहिली ते चौथीच्या शाळा येत्या १० डिसेंबरपासून सुरू होतील. १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याच्या वृत्तामुळे शहरातील पालकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण होते. लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी मुलांना स्कूल व्हॅनमधून शाळेत पाठवावे की नाही किंवा मुलांना लसीकरणाशिवाय शाळेत पाठवावे की नाही, अशी चिंता पालकांना सतावत होती. त्यातच मागील चार दिवसांत ओमिक्रॉनचे संकट उभे राहिल्याने या चिंतेत अधिकच भर पडली. शहरातील पाचवी ते दहावीच्या शाळा सुरू असून, अद्याप त्या पुढे किती दिवस सुरू ठेवायच्या यावर निर्णय झालेला नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …