ठळक बातम्या

औरंगाबादच्या नव्या पाणीपुरवठा योजनेवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

विकृ विकृत लोक अफवा पसरवत आहेत – सुभाष देसाई
औरंगाबाद – महानगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत, तसे शहरातील विविध राजकीय मुद्देही डोके वर काढत आहेत. शहरातील नेत्यांनी आता नव्या पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा उचलून धरला आहे. जायकवाडी धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १६८० कोटी रुपये अंदाजित खर्च असलेल्या या योजनेला दिरंगाई होत असल्याचा आरोप शिवसेनेवर केला जात आहे. मात्र शुक्रवारी शिवसेना नेते आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी योजनेचे काम आणि त्यावर चाललेल्या राजकीय कुरघोडीवरून भाष्य केले. त्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि भाजपचे आमदार अतुल सावे यांनीही खरमरीत प्रतिक्रिया नोंदवली आहे.
पालकमंत्री सुभाष देसाई गेल्या काही दिवसांपासून शहरात आहेत. शहरातील विविध राजकीय कार्यक्रमांना त्यांची सक्रिय उपस्थिती आहे. सुभाष देसाई म्हणाले, शहरातील पाणीपुरवठा योजनेबद्दल विकृ त प्रवृत्ती अफवा पसरवत आहेत. ही योजना अजिबात रखडलेली नाही. १६८० कोटी रुपयांची रक्कम महिना दोन महिन्यांत खर्च होणार नाही, तीन वर्षांत ही योजना पूर्ण होणार आहे, असे स्पष्टीकरण सुभाष देसाई यांनी दिले.
तर पालकमंत्री योजनेच्या कामाबाबत खोटे बोलत असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. ही योजना या गतीने सुरू राहिल्यास योजना पूर्ण होण्यास पाच ते सात वर्षे लागतील. निवडणुकांसाठी शिवसेनेकडून योजनेचे काम वेगात सुरू असल्याच्या केवळ घोषणा दिल्या जात आहेत. लोकांना कामाविषयी काही घेणे देणे नाही, त्यांना पाणी हवे आहे. पण शिवसेनेचा हा प्रकार लोकांना उल्लू बनवण्याचा आहे, असा आरोप खा. इम्तियाज जलील यांनी केला आहे.
दुसरीकडे, या योजनेविषयीच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये भाजपनेही उडी घेतली आहे. भाजपचे आमदार अतुल सावे म्हणाले, पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी न आणता शहरात टाक्यांचे काम आणि पाइपलाइनचे काम सुरू आहे. हा सगळा प्रकार निवडणुकीच्या तोंडावर लोकांना चुकीचे सांगण्याचा प्रकार आहे. पाण्याच्या टाक्या आहेत, पाइपलाइन उपलब्ध आहे फक्त पाणी हवे आहे, पण पाणी आणले जात नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टरला खूश करण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे, असा आरोप आमदार अतुल सावे यांनी केला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …