ठळक बातम्या

‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका अलर्ट, अवघ्या ९ रुपयांत अँटिजेन टेस्ट किट

अर्ध्या तासात अहवाल मिळणार
मुंबई – कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंट संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका अलर्ट झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापैकी एक म्हणजेच शहरातील कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिका रॅपिड अँटिजेन चाचण्यांचे २० लाख किट विकत घेणार असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेला एक किट अवघ्या ९ रुपयांना मिळण्याची शक्यता आहे, तर रॅपिड अँटिजेन टेस्टमुळे व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला आहे की नाही याची माहिती अर्ध्या तासात मिळणार आहे.
दक्षिण आफ्रिका, युरोप या देशांमध्ये थैमान घालणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आतापर्यंत केवळ दोन बाधित रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. तरीही खबरदारी म्हणून महापालिकेने कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. यासाठी २० लाख अँटिजेन चाचण्यांचे किट खरेदी केले जाणार आहेत.
विशेष म्हणजे केवळ ९ रुपयांमध्ये ही चाचणी होऊन अर्ध्या तासांमध्ये अहवाल हातात पडणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून, लवकरच स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी येणार आहे. मुंबईतील दररोज ३५ ते ४० हजार लोकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये सद्यस्थितीत सुमारे अडीशे बाधितांची नोंद होत आहे.
पालिकेने अँटीजेन किट खरेदी करण्यासाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेला पाच ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. एका चाचणीसाठी ९ रुपये किमान दर ठेकेदाराने लावला आहे. स्पर्धा वाढल्याने कंपन्यांकडून कमी दर मिळाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या खरेदीमध्ये सुरुवातीला ५ लाख रुपयांच्या ५० हजार किट्स घेण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानक, मॉल, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे, बस स्थानके अशा ठिकाणी वेगाने चाचण्या करण्यासाठी या किट्सचा फायदा होणार आहे. पालिकेच्या चाचणी केंद्रांत अँटिजेन चाचणी विनामूल्य केली जाते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …