ठळक बातम्या

एस.टी.संपामुळे खाजगी व सार्वजनिक वाहतूकदारांनी  प्रवाशांना धरले वेठीस, वाहतूक पोलिस बनले धृतराष्ट्र   

भिवंडी : भिवंडी  शहराबाहेर जाण्यासाठी तसेच ठाणे अथवा कल्याण रेल्वे स्थानक गाठण्यासाठी एस.टी.वाहतुकीशिवाय पर्याय नाही. एस.टी.कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप जाहीर केल्याने शहराबाहेर जाण्यासाठी खाजगी व सार्वजनिक प्रवासी वाहतूकदरांनी प्रवाशांना वेठीस धरून त्यांची आर्थिक लूट सुरु केली आहे. याप्रकरणी संबंधित वाहतूक पोलिसांनी धृतराष्ट्राची भूमिका घेतल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

                           राज्य परिवहन मंडळाचे (एस.टी) राज्य शासनाच्या व्यवस्थेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी एस.टी.कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. अशावेळी शहरातील नोकरदार वर्गाला नाईलाजाने खाजगी वाहतूक अथवा सार्वजनिक प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.या प्रवासी वाहन चालकांनी प्रवाशांना वेठीस धरून अवाच्यासव्वा भाडे वसूल करीत आहेत. या बाबत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व  स्थानिक वाहतूक पोलीस रिक्षाचालक आणि इतर खाजगी वाहनांवर कोणतीही कारवाई करीत नाही. वास्तविक अशा लांब पल्ल्याच्या ठिकाणी सुरु असलेल्या प्रवासी वाहतुकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमावली आणि वाहतूक भाडे निश्चित करण्याची गरज आहे. ज्यादा भाडे घेणाऱ्या रिक्षा व टॅक्सी विरोधात भिवंडी,कल्याण आणि ठाणे वाहतूक विभागाकडे अनेकदा प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत पण पोलिसांनीही धृतराष्ट्राची भूमिका घेत दुर्लक्ष केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्यानंतर शासनाने सर्व सुविधा खुल्या केल्या असताना नागरिकांना प्रवासी वाहन चालकांच्या मोजोरगिरीचा सामना करावा लागत आहे. कल्याण भिवंडी रिक्षा प्रवास ६० रुपये ते १०० रुपये झाला आहे. तर ठाणे भिवंडी प्रवास १०० ते १५० रुपये झाला आहे. या सर्व  आर्थिक लूट करणाऱ्यांवर कोणी अंकुश आणणार आहे कि नाही ? असा आक्रोश सध्या प्रवासी नोकरदार व विद्यार्थी वर्गातून होत आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …