मुंबई – साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा. विलिनीकरणाची प्रक्रिया सुरूच राहिल; पण आता वेतन आयोग लागू झाला नाही, पगार वाढला नाही, तर आज ३७ कामगार गेले. उद्या हा आकडा ३७० होईल. त्यामुळे साहेब, तुम्हीच या प्रकरणात लक्ष घाला. तुम्हीच आमचे तारणहार आहात, असा आर्त टाहो एसटी कामगारांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसमोर फोडला. एसटी कामगारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृ ष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एसटी कामगारांनी त्यांच्या व्यथा राज यांच्यासमोर पोटतिडकीने मांडल्या. एक हजार लोकांना निलंबनाच्या नोटीस आल्या आहेत. १२ दिवसांनंतर त्यांच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. विलिनीकरण करायचे म्हणजे त्यात दोन पार्ट येणार. राज्य सरकारच्या ड्रायव्हरला जो पगार आहे. तोच आमच्या ड्रायव्हरला पगार मिळेल. एवढे साधे सोपे गणित आहे. आता आमच्या पगारावर तीनशे कोटी रुपये खर्च होतात. विलिनीकरणानंतर सातवा वेतन आयोग लागू होईल. त्यामुळे त्याचा बोजा साडेतीनशे कोटी ऐवजी एक हजार कोटी होईल, असे या कामगारांनी सांगितले. ७० वर्षे आम्ही महाराष्ट्राची सेवा करतोय. महाराष्ट्र घडवण्यात आमचाही वाटा आहे ना? प्रत्येकवेळी आमच्यासाठी पैसे कसे नसतात? अर्थसंकल्पात तरतूद करा. विलिनीकरणाची समिती बनली आणि हातात काही आले नाही, तर १२ दिवस आंदोलन केल्यानंतर बायकोला सांगायचे काय?, १२ दिवस संपात बसलो पगार वाढणार आहे का नाही?, मग कशाला बसला १२ दिवस संपात?, असा सवाल आम्हाला घरातून विचारला जाईल. आता पगार नाही वाढला, तर काय अवस्था होईल आमची. समित्या होतील. कोर्ट कचेरी होईल, पुढे काय? असा सवाल कामगारांनी केला.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …