मुंबई – ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात हजारो एसटी कर्मचारी बुधवारी एकत्र जमले होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, अशी घोषणाच पडळकर यांनी केली.
राज्य सरकार म्हणतं एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली. जर दिवाळी गोड केली, तर आत्महत्या का झाल्या? असा सवाल पडळकर यांनी केला. ३५ कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. हे तुमचे आंदोलन आहे; पण जबाबदारी आमची आहे. माणुसकीच्या हेतूने आम्ही तुमच्यासोबत आहोत. सरकारकडे खायला पैसे आहेत, गरीबांना द्यायला नाहीत. त्यामुळे आता मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नाही, अशी घोषणाच पडळकर यांनी केली. आम्ही तुमच्यासोबत इथेच झोपणार. बायका-मुलांना बोलावून घ्या. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा इशारा पडळकर यांनी दिला.
संकटाच्या काळात एसटी कर्मचारी तुम्हाला चालतो; पण विलिनीकरणाचा मुद्दा आला, तेव्हा अवमान याचिका दाखल करता. कर्मचारी संकटात असताना, तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता. मी इथे विरोधी पक्षनेता म्हणून आलेलो नाही. एका एसटी कर्मचाऱ्याचा मुलगा म्हणून तुमच्यासमोर आलोय, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. किरीट सोमय्यांमुळे अनिल परब पळून जायला नकोत. परब पळून गेले, तर आम्हाला न्याय कोण देणार? असा खोचक सवाल दरेकर यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांसाठी १०० वेळा उंबरठे झिजवायला तयार आहे. न्याय मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …