ठळक बातम्या

एसटीचे विलिनीकरण अशक्य; माजी परिवहन आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना सल्ला

पुणे – राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही सहभागी झाले आहेत, तर परिवहन मंत्री अनिल परब संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करीत आहेत. अशावेळी माजी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारलाही झगडे यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरणाची मागणी कर्मचाऱ्यांनी जास्त काळ लावून धरू नये. राज्य शासनात महामंडळाचे विलिनीकरण शक्य नाही आणि विलिनीकरण करू नये, असे महेश झगडे यांनी म्हटले आहे, तर एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या राज्य सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणीत वाढ झाली नाही, त्यांना सुविधाही मिळाल्या नाहीत, म्हणून त्यांच्याकडून मागणी केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण देशभरात सगळ्या सेवा या खासगीकरणाकडे चालल्या आहेत. रेल्वे, एअर इंडिया, एमएसईबी यामुळे राज्य शासनात विलिनीकरण शक्य नाही. राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. एसटी महामंडळाचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन कर्मचाऱ्यांना काय देता येईल ते बघायला हवे, असेही झगडे म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …