ट्विटरवरून दिली माहिती
मुंबई – शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. ऊर्मिला मातोंडकर यांनी स्वत: ट्विटरवरून आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही ऊर्मिला मातोंडकर यांनी केले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घेत सण साजरा करावा, असेही त्या म्हणाल्या. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मी बरी असून स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. सध्या होम क्वारंटाईन असून, माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ऊर्मिला मातोंडकर यांनी केले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनादेखील काही दिवसांपूर्वी दुसऱ्यादा कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे)चे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील कोरोना झाला होता. राज ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोना विषाणू संसर्ग संपला नसल्याने नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये म्हणून नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, ऊर्मिला मातोंडकर यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे ट्विट करताच त्यांचे चाहते त्या लवकरात लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करीत आहेत. ऊर्मिला मातोंडकर सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असल्या, तरी सोशल मीडियावर त्या खूप सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी त्या खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असतात.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …