ठळक बातम्या

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून एकाच गावातील १५ जणांचा मृत्यू

दुर्घटनास्थळी  बचावकार्यात गुंतलेले पोलीस व एसडीआरएफ कर्मचारी

देहरादून – उत्तराखंडमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली. येथील विकासनगरजवळील बुल्हाड-बायला मार्गावर एक बस दरीत कोसळली. या दुर्घटनेमध्ये एकाच गावातील १५ जणांचा मृत्यू झाला. अनेक प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त बसमधून २५ जण प्रवास करीत होते. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळून हा अपघात झाला. उपविभागीय अधिकारी, पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचाव कार्य सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी बचावकार्यात सहभाग घेतला.
अपघाताची सर्वप्रथम माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. या दुर्घटनेबाबत पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या अपघातामागे ओव्हरलोडिंग हे एक कारण असू शकते. बसमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी होते. बस ज्या मार्गाने जात होती, तेथून वाहनांची संख्या कमी असते. त्यामुळे या बसमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असावेत, असा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी या दुर्घटनेबद्दल ट्विट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हा प्रशासनाला बचावकार्य वेगाने करण्याच्या आणि जखमींवर तात्काळ उपचार करण्याच्या सूचना धामी यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
जम्मू-काश्मीरमध्येही दोन दिवसांपूवी (२८ ऑक्टोबर) एका बसला असाच भीषण अपघात झाला होता. थाथरीहून डोडाकडे जाणारी मिनी बस दरीत कोसळून घडलेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. तत्पूर्वी, ७ ऑक्टोबर रोजीही उत्तराखंडमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. उत्तर प्रदेशातील लखनऊ शेजारील बाराबंकी जिल्ह्यातील बबुरिया गावाजवळ हा अपघात झाला होता. या अपघातात घटनास्थळीच १३ जणांचा मृत्यू झाला होता, तर २५ प्रवासी जखमी झाले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …