ठळक बातम्या

आर्यन खान आज सुटणार

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानची जामिनावर सुटका केल्याचा आदेश गुरुवारी जारी केला असला तरी त्याची प्रमाणित प्रत शुक्रवारी निर्धारित वेळेत तुरुंगात पोहोचलेली नाही. आर्थर रोड तुरुंगाची जामीन आदेश स्वीकारण्याची वेळ संपल्याने हा दस्तावेज नाकारण्यात आला. त्यामुळे आर्यन खानची शुक्रवारची रात्रही तुरुंगातच जाणार असल्याचे स्पष्ट झाले. आर्यन खानला गुरुवारी जामीन मिळाला असला तरी या प्रक्रियेत लागणाऱ्या वेळेमुळे त्याला शुक्रवारीही तुरुंगातच राहावे लागले. आता आर्यन खानची शनिवारी सुटका होणार असल्याची माहिती आर्थर रोड कारागृह अधीक्षकांनी दिली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खान गेल्या २६ दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यनला एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. आर्यन खानला गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला होता. पण न्यायालयाची प्रत पोहोचली नसल्याने त्याला एक रात्र तुरुंगातच काढावी लागली होती. अखेर शुक्रवारी न्यायालयाने जामीन आदेशाची प्रत जारी केली. त्यामुळे आर्यन खान तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला होता, परंतु आदेशाची प्रत निर्धारित वेळेत (संध्याकाळी साडेपाचपर्यंत) कारागृहात न पोहोचल्याने त्याला शुक्रवारी रात्रीही तुरुंगातच राहावे लागले. आर्यन खानच्या जामीन अर्जावर सही करण्यासाठी जामीनदार म्हणून अभिनेत्री जुही चावलाने महत्त्वाची भूमिका बजावली. जामीन देण्यासोबतच उच्च न्यायालयाने आर्यन खानला काही अटी आणि नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. न्यायालयाच्या अटींनुसार, आर्यन खानला इतर कोणत्याही आरोपींसोबत संपर्क साधता येणार नाही. या व्यतिरिक्त विशेष न्यायालयाच्या कारवाईला कोणत्याही प्रकारे अडथळे निर्माण होतील, असे काहीही आर्यन खानने करू नये. तसेच जामीन अर्ज मंजूर करताना उच्च न्यायालयाने आर्यन खानला आपला पासपोर्ट विशेष न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आर्यन खान उच्च न्यायालयाच्या परवानगी शिवाय देश सोडू शकत नाही. आर्यन खान मुंबईतूनही बाहेर जाणार असेल तर याबाबतची माहिती त्याने या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांना आधीच देणे आवश्यक आहे. आर्यन खानने अटी मान्य करून त्यांचे पालन केले नाही, तर मात्र त्याचा जामीन रद्द होऊ शकतो, असा इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …