केंद्र आणि बैठक क्रमांकही वेगवेगळे
बीड – आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ पदासाठी रविवारी (३१ ऑक्टोबर) राज्यभरात परीक्षा होणार आहेत. याच परीक्षेसाठी जिल्ह्यामधील एका उमेदवाराला एक दोन नव्हे, तर तब्बल ३४ हॉल तिकिटे आली आहेत. प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यासमोर परीक्षा द्यायची कोठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या निमित्ताने आरोग्य विभागाचा गोंधळ आणि गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील शहाबाजपूर येथे राहणाऱ्या पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्याने २० ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. यासाठी ६३० रुपये शुल्कही भरले होते. परीक्षेसाठी त्याने औरंगाबाद विभागाची निवड केली होती. गट ‘क’ पदासाठी २४ ऑक्टोबरला परीक्षा झाली असून, आता गट ‘ड’ साठी रविवारी परीक्षा होत आहे, परंतु यातही मोठा गोंधळ असल्याचे उघड झाले आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध परीक्षांच्या जाहिराती जाहीर केल्या जात आहेत. एमपीएससीने शुक्रवारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ ची ६६६ पदांची जाहिरात जारी केली आहे. याद्वारे पोलीस उपनिरीक्षक ३७६, राज्य कर निरीक्षक १९० आणि सहाय्यक कक्ष अधिकारी १०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ द्वारे भरावयाच्या एकूण ६६६ पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक २६ फेब्रुवारी, २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास २९ ऑक्टोबर दुपारी २ पासून सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक १९ नोव्हेंबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ५४४ तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३४४ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ऑनलाईन-ऑफलाईन पद्धतीने भरता येणार आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
One comment
Pingback: จํานําโฉนดที่ดิน ไม่ใช่ชื่อเรา