औरंगाबाद – कोरोनाची लाट ओसरली असतानाच नवी कोरोना व्हेरिएंटने डोकेवर काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राज्यात कोरोनाची नवीन नियमावलीच जाहीर करण्यात आली असून, मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे, पण दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह नेत्यांना चक्क मास्कचा विसर पडल्याचे समोर आले आहे.
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने येथील जलसंपदा विभागाच्या वतीने रविवारी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हजर होते, पण यावेळी राजेश टोपे यांच्यासह अधिकारी आणि नेत्यांनाच मास्कचा विसर पडला. कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंत्री आणि नेते मास्क वापरत नसल्याचे समोर आले आहे. एवढेच नाहीतर सोशल डिस्टन्सिंगचाही पुरता फज्जा उडाला होता.
दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा घातक व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यामुळे राज्यात विशेष खबरदारी घेतली जात आहे. राज्य सरकारने शनिवारीच कोरोनाची नवीन नियमावली प्रसिद्ध केली असून, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे असे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत, पण दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेते मात्र बेफिकीर असल्याचे दिसून आले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह पाच मंत्र्यांना आणि एका आमदारांना मास्कचा विसर पडला. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, संदीपान भुमरे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार यांच्याकडून कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली झाल्याचे समोर आले आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …