पुणे – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तीन ते चार दिवसांनी दुप्पट होत आहे. वाढती रुग्णसंख्या म्हणजे कोरोनाची तिसरी लाट येत असल्याचे संकेत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य सरकारकडून कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत, तसेच विलगीकरणाचा कालावधीही कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आयएमएने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सद्वारे कोरोना बाधितांवरील उपचार तसेच औषधे यांविषयीची माहिती देण्यात येणार आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने स्थापना केलेल्या या टास्क फोर्समधील सदस्यांकडून कोरोनावरील उपचार पद्धती, त्यासाठीची औषधे आदी माहिती डॉक्टरांना देण्यात येईल. या टास्क फोर्समध्ये राज्यातील नामवंत डॉक्टर तसेच आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. घरात विलगीकरणातील रुग्णांनी नेमके काय करावे?, त्यांनी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती दिली जाणार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असेल, तर त्याच्या कुटुंबातील, सोसायटीतील आणि आजूबाजूच्या लोकांनी स्वत:ची कशी काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शनही टास्क फोर्स करणार आहे. या टास्क फोर्समध्ये डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. अर्चना पाटे, डॉ. अनिला मॅथिव्ह, डॉ. भाविन झंकारिया, डॉ. संजय मानकर, डॉ. भक्ती सारंगी, डॉ. अविनाथ फडके, डॉ. सुप्रिया अमेय, डॉ. अरुणा पुजारी, डॉ. संगीता चेक्कर, डॉ. शशांक जोशी, डॉ. हर्षद लिमये आदी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …