विविध देवस्थानांची ४५० एकर जमीन लाटली?
औरंगाबाद – बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी आष्टी तालुक्यातील इनामी जमिनी आपल्या मालकीच्या करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकाराखाली ही माहिती उघड झाली आहे. आष्टी येथील देवस्थाने आणि मशिदीच्या इनाम जमिनींमध्ये सुरेश धस यांच्या सांगण्यावरून आणि महसूल खात्याच्या आशीर्वादामुळे जवळपास एक हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे आणि ॲड. असीम सरोदे यांनी केला आहे. विविध देवस्थानांची तब्बल ४५० एकर जमीन लाटल्याचा ठपका धस यांच्यावर ठेवण्यात आला आहे, तसेच जमिनीच्या व्यवहारात शासनाचा महसूल बुडवण्यात आला असून, सामान्य माणसाची फसवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे यांनी जारी केलेल्या एका पत्रकानुसार, खर्डा येथील विठोबा देवस्थान, आष्टीतील पिंपळेश्वर महादेव, मानूर येथील श्री विरुपाक्ष स्वामी गुरू, श्री गिरीस्वामी मठ, चिंचपूर दर्गा येथील जमिनींबाबत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …