मुंबई – नाकार्ेटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)चे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने मंगळवारी पहिल्यांदाच मीडियासमोर आपली प्रतिक्रिया दिली. तुम्हाला जाळून टाकू, मारून टाकू, लटकवून टाकू अशा धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत. आमच्या जीवाला धोका आहे, असे क्रांती रेडकरने सांगितले. क्रांती रेडकरने पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने समीर वानखेडेंवरील आरोप फेटाळून लावतानाच त्यांना येत असलेल्या धमक्यांबद्दलचीही माहिती दिली. आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. ट्रोल केले जात आहे. लटकवून टाकू, जाळून टाकून, मारून टाकू अशा धमक्या आम्हाला येत आहेत; मात्र समीर यांच्या कामाचा तो अविभाज्य भाग आहे असे वाटते, असे क्रांतीने सांगितले.
फेक अकाऊं टवरून आम्हाला धमकी दिली जात आहे. तुमची परेड करू, तुम्हाला जाळू अशा धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढले असून, वेळ आल्यानंतर ते जाहीर करू, असेही क्रांती रेडकरने सांगितले. वानखेडे या प्रकरणातून बाहेर पडणारच. शेवटी सत्याचाच विजय होणार आहे. वेळच नवाब मलिकांना उत्तर देईल. अजूनही कटकारस्थाने केली जातील. अनेक कागदपत्रे तयार केली जातील. त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे तिने नमूद केले.
समीर वानखेडेंवर होणाऱ्या आरोपामुळे निश्चित त्रास होतोय, असे सांगतानाच मराठी असल्याचा मला अभिमान आहे. समीर वानखेडेंचे विरोधक आम्हाला त्रास देत आहेत, असे तिने सांगितले. महाराष्ट्र सरकार समजदार आहे. सहकार्य करणारे आहे. त्यामुळे सत्याचा विजय होईल. जेव्हा सत्य कळेल, तेव्हा सरकार वानखेडेंच्या बाजूनेच उभे राहील, अशी खात्री आहे, असेही क्रांतीने सांगितले.
समीर केवळ कलाकारांना पकडत नाही. शंभर टक्क्यांतून तीन टक्के लोक कलाकार असतील. ते डॉन किंवा ड्रग्ज पेडलर यांना पकडत असतात. ते केंद्र सरकारच्या तपास संस्थेसोबत काम करीत आहेत; मात्र ते कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत, असेही तिने सांगितले. भाजपच्या सांगण्यानुसार समीर वानखेडे कारवाई करतात, त्यानुसार त्यांच्या कारवाईची दिशा ठरते, असा आरोप समीर वानखेडे यांच्यावर केला जातोय. या प्रश्नाला उत्तर देताना क्रांती रेडकर म्हणाली, या आरोपात कोणतेही तथ्य नाही.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …