मुंबई – महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर जाणारच, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र महापरिनिर्वाण दिनी मुंबईत न येण्याचे आवाहन आंबेडकरी जनतेला केले आहे. महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेबांना घरूनच अभिवादन करा. चैत्यभूमीवर येणे टाळा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हे आवाहन केले आहे. ६ डिसेंबर रोजी (सोमवारी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईला यावे की नाही?, अशी विचारणा केली जात आहे. सध्या रेल्वे पूर्णपणे चालू झालेली नाही. एसटीचा ही संप सुरू आहे. सोबतच कोरोनाच्या नव्या व्हायरस आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल कुणालाच अंदाज येत नाही. अशा परिस्थितीत आपण येणे टाळावे, असे माझे आवाहन आहे. शासनाचे नियम पाळा. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना मानवंदना देण्याचे काम करू या, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. महापरिनिर्वाण दिनी सर्वांनी संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. आंबेडकरवादी राजकीय पक्षालाच तारण्याचे काम आम्ही करू आणि आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करू हा संकल्प सगळ्यांनी करू या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आंबेडकरी जनतेला चैत्यभूमीवर येण्याचे आवाहन करतानाच सरकारचे आवाहन धुडकावून लावले होते. आंबेडकरी समाज हा मृत्यूला कधीही भ्यायलेला नाही, असे ठणकावून सांगतानाच येत्या सोमवारी ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आम्ही लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर जाणारच, असे आनंदराज बुधवारी म्हणाले होते.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …