ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची बोटे छाटली गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा फेरीवाल्याने महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांवर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या पातलीपाडा भागात असणाऱ्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर दोन दिवसांपूर्वी अतिक्रमणविरोधी कारवाई करताना हा प्रकार घडला. आधी बोटे कापली, आता गळा कापू, अशा शब्दांत फेरीवाल्याने अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. मात्र याबाबत अद्याप कासारवडवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला धमकी देणारा हा फेरीवाला हा नारळ विक्रेता आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या पातलीपाडा भागात असलेल्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर दोन दिवसांपूर्वी अतिक्रमणविरोधी कारवाई करताना हा प्रकार घडला. यापूर्वी सहाय्यक पालिका आयुक्त कल्पिता पिंपळे या महिला अधिकाऱ्यासह त्यांच्या अंगरक्षकाची बोटे एका फेरीवाल्याने कापली होती. ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईदरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची तीन बोटे तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले होते. कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्यानंतर सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त केला गेला होता. त्यानंतर फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण ठाण्यात अनधिकृ त फेरीवाल्यांची दादागिरी अजून काही थांबलेली नाही, हे या घटनेवरून दिसून येत आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …