आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई – रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, १४ नोव्हेंबर रोजी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामांमुळे दोन्ही मार्गांवरील लोकल उशिराने धावतील.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व विद्याविहार स्थानकांदरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी-विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव व कुर्ला या स्थानकांवर थांबतील, तर घाटकोपर स्थानकातून सुटणाऱ्या अप-धिम्या मार्गावरील लोकल विद्याविहार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप-जलद मार्गावर वळवण्यात येणार असून, या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून वाशी-बेलापूर-पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल व पनवेल-बेलापूर-वाशी स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मेगाब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व कुर्लादरम्यान तसेच पनवेल आणि वाशीदरम्यान विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत मेन लाइन आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट-मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते ३.३५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दुरुस्तीच्या कालावधीत चर्चगेट-मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …