ठळक बातम्या

आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर बलात्कार * झारखंडमधील पश्चिम सिंहभूम येथील घटना; भाजपच्या बड्या नेत्याला अटक

सहा महिन्यांपासून सुरू होते लैंगिक शोषण
रांची – आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना झारखंड राज्यातील पश्चिम सिंहभूम येथे उघडकीस आली आहे. पीडित महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय जनता पक्षाचा एका बडा नेता आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपी भाजप नेत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पीडित महिलेने लावलेल्या आरोपात तथ्य असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
संजय मिश्रा असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम सिंहभूमचा प्रसारमाध्यम प्रभारी आहे. याबाबत माहिती देताना चक्रधरपूरचे डीएसपी दिलीप खलको यांनी मंगळवारी सांगितले की, आरोपी आणि पीडित महिलेची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर आरोपी संजय मिश्राला अटक करण्यात आली आहे. डीएसपी दिलीप खलको यांनी सांगितले की, पीडित तरुणीने लावलेल्या आरोपात तथ्य असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
तसेच पीडित आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्यासंदर्भातीलआरोपात देखील तथ्य आढळले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय मिश्रा हा एप्रिल महिन्यापासून पीडित तरुणीला ब्लॅकमेल करीत होता. संजय मिश्रा याने पीडित महिला खेळाडूचा एक फोटो काढला होता. संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो पीडितेला एका स्थानिक हॉटेलमध्ये बोलावून तिचे लैंगिक शोषण करीत होता.
अटक होण्यापूर्वी संजय मिश्रा याने एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की, माझे विरोधक मला निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत पराभूत करू इच्छित आहेत. त्यामुळे त्यांनी एकजुटीने माझ्याविरोधात वातावरण निर्माण केले आहे. माझ्यावर बलात्काराचा आरोप होणे हे विरोधकांनी रचलेले घृणास्पद षड्यंत्र आहे. माझा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. पोलिसांनी दोघांचे कॉल डिटेल्स तपासावे, तसेच आरोपात ज्या हॉटेलचा उल्लेख करण्यात आला आहे, त्या हॉटेलातील ३ एप्रिलचे रजिस्टर तपासावे, तसेच सीसीटीव्ही पाहावेत, असेही त्याने म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

2 comments

  1. Pingback: dewahk

  2. Pingback: togel singapore