नव्वदीतील वृद्धासह पत्नी राहत्या घरी मृतावस्थेत
अहमदाबाद – गुजरातमधील अहमदाबाद शहरात एका वयोवृद्ध दाम्पत्याची राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली. दरोड्याच्या उद्देशाने दोघा ज्येष्ठ नागरिकांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींनी घरात घुसून पती-पत्नीचा जीव घेतला. पोलीस उपायुक्त (झोन-१) रवींद्र पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार ९० वर्षीय दयानंद शानबाग आणि त्यांची ८० वर्षीय पत्नी विजयलक्ष्मी शानबाग हे घाटलोदिया परिसरातील पारसमणी सोसायटीमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. शानबाग दाम्पत्याचा मुलगा आपल्या पत्नी-मुलांसह शहरातील दुसऱ्या भागात राहतो. मंगळवारी रात्री सोसायटीत राहणारी एक वयोवृद्ध व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आली, तेव्हा दोघे मृतावस्थेत आढळून आले. स्थानिक रहिवाशांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दाम्पत्याचे घर पाहिले असता, त्यांच्या कपाटाचे दार तोडलेले दिसले. खोलीतील सामानही अस्त्याव्यस्त पडले होते. त्यामुळे लुटीच्या उद्देशाने दोघांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी अधिक तपासासाठी मयत दाम्पत्याच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावले. तपासासाठी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …