मुंबई - करी रोड येथील अविघ्न पार्क या ६० मजली इमारतीच्या १९ मजल्यावर लागलेल्या आगीचा अहवाल पुढील आठवड्यात सादर केला जाणार आहे. आग कशामुळे लागली, अग्निशमन यंत्रणा कार्यरत होती का ? तसेच अनधिकृत बांधकाम आदीबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. यात दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी अविघ्न पार्क या इमारतीला भीषण आग लागून त्यात एकाला जीव गमवावा लागला. आग लागली तेव्हा येथील अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे समोर आले. दर सहा महिन्यांनी संबंधित सोसायटीने फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे, मात्र याकडेही दुर्लक्ष करण्यात आले, तसेच इतर नियमही धाब्यावर बसवण्यात आल्याचे उघड झाले आहे. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाने या आगीची चौकशी सुरू केली आहे. पुढील आठवड्यात चौकशी अहवाल सादर केला जाणार असून, यात दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …