अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली – प्रवीण दरेकरांचा घणाघात

मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी भावनिक बोलून एसटी कर्मचारी यांचा प्रश्न सुटणार नाही, असे दरेकर म्हणाले आहेत. अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. भाजपला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कुणाची पोळी भाजण्याची गरज नाही. कोणतीही इच्छा असेल, तर सर्व क ाही करता येईल. महाराष्ट्रातील एसटी महामंडळ हे देशातील सर्वात मोठे महामंडळ आहे. त्यात काही लिकेजेस आहेत. ती व्यवस्थित केली, तर सर्व काही व्यवस्थित करता येईल, असे दरेकर म्हणाले आहेत. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांवर जुलमी स्वरूपाची कारवाई सुरू आहे. एसटी बंद करून खासगी बसेस सुरू करीत आहेत. यातून काही मलिदा लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा सवाल असून, याची चौकशी झाली पाहिजे, असे दरेकर म्हणाले. एका बाजूला एसटी बंद ठेवायची आणि दुसरीकडे खासगी वाहतुकीला प्रोत्साहन द्यायचे, हे चुकीचे असल्याचे दरेकर म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …