अनिल परबांनी ईडीला काय जबाब दिला हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे काय? – सोमय्यांचा सवाल

मुंबई – राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यावेळी ते शुद्धीत नव्हते. अनिल परब यांनी ईडीला काय कबुली जबाब दिला हे तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहीत आहे काय?, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केला. किरीट सोमय्या यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना हा सवाल केला. यावेळी त्यांनी विविध घोटाळ्यांवरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. परमबीर सिंग यांच्यावर त्यांच्या बॉसने १७ केसेस दाखल केल्या आहेत. ते फरारी आहेत. मग त्यांच्या पत्राला गांभीर्याने कसे घेता?, असा सवाल त्यांनी केला.
सकाळी सकाळी दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजर राहिलो. अभिनेता भाऊ कदमचा कार्यक्रम होता. भाऊ कदम सांगतात, आम्ही दिवाळीत फटाके फोडतो. किरीट सोमय्या वर्षभर फटाके फोडतात. दिवाळीनिमित्त बायकोच्या हातची करंजी खाल्ली. आता पुढच्या दर आठवड्यात एकाएका मंत्र्याचा पाठपुरावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या महिनाभरात ठाकरे सरकारमधील तीन मोठ्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे. या मंत्र्यांचे राज्यातील राजकीय क्षेत्रात मोठे वजन आहे, असे सांगतानाच या मंत्र्यांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक हजार कोटींची संपत्ती जप्त झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. अजित पवारांची ही संपत्ती बेनामी आहे. त्यांचे नाव जरी त्यात नसले, तरी ही संपत्ती त्यांचीच आहे, असा दावा त्यांनी केला. येत्या १ जानेवारीला १० नेते प्राथमिक चौकशी होऊन गुन्हेगार ठरतील. काही जेलमध्ये असतील, तर काही रुग्णालयात असतील, असा दावाही त्यांनी केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …