अनिल देशमुखांना कधी भेटलो आठवत नाही

सचिन वाझेंची चांदीवाल आयोगासमोर साक्ष
मुंबई – राज्य सरकारने नेमलेल्या न्या. चांदीवाल न्यायालयीन चौकशी आयोगात बुधवारीही सचिन वाझे यांची उलटतपासणी करण्यात आली. अनिल देशमुख यांचे वकील ॲड. अनिता कॅ स्टेलिनो यांनी वाझेंची उलटतपासणी केली. या उलटतपासणीत सचिन वाझे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यात सर्वात महत्त्वाचे उत्तर होते, ते म्हणजे अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना, आपण त्यांना कधी भेटलो आहोत याबाबत आपल्याला काहीच आठवत नाही, असे वाझेंनी सांगितले.
साधारण दुपारी पाऊणच्या सुमारास न्या. चांदीवाल न्यायालयीन चौकशी आयोगासमोर सुनावणीस सुरुवात झाली. सचिन वाझे यांना उलटतपासणीकरिता विटनेस बॉक्समध्ये बोलावले गेले आणि देशमुख यांचे वकील ॲड. अनिता कॅ स्टेलिनो यांनी सचिन वाझेंना प्रश्न विचारले. पण सचिन वाझे यांनी उत्तर देण्याआधीच अनिल देशमुख यांच्या दुसऱ्या एका वकिलाने मध्यस्थी करीत सचिन वाझे आणि परमबीर सिंग या दोघांची दोन दिवसांपूर्वी झालेली तासाभराची भेट याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आलेल्या वृत्तांकनावर नाराजी व्यक्त केली. ती कोणत्याही प्रकारची ग्रुपची बैठक नव्हती, असे सांगून प्रसारमाध्यमांनी केलेल्या वार्तांकनामुळे परमबीर सिंग यांना त्रास होत असल्याचे या वकिलाने आयोगाला सांगितले.
मात्र याच वेळेस स्वत: सचिन वाझे यांनीच अनिल देशमुख यांच्या वकिलांच्या नाराजीला उत्तर देत प्रसारमाध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि जे घडले ते त्यांनी लिहिले असे सांगितले. तर न्यायालयीन चौकशी आयोगाचे वरिष्ठ विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मध्यस्थी करीत ही खुली चौकशी आहे. यात सर्वांना काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. जे घडले ते सांगितले गेले आणि लिहिले गेले असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी केला. तोच अनिल देशमुख यांच्या वकिलांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आणि पुन्हा सचिन वाझेंच्या उलटतपासणीला सुरुवात झाली.
सचिन वाझेंची उलट तपासणी झाल्यानंतर न्यायालयीन चौकशी आयोगाचे कामकाज थांबवण्यात आले आणि पुढील सुनावणी १३ डिसेंबरला दुपारी एक वाजता ठेवण्यात आली, तर सचिन वाझेंना त्यांच्या वकिलांना भेटण्यासाठी तसेच आणि देशमुख यांना त्यांच्या वकिलांना आणि त्यांच्या वकिलाने त्यांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …