मुंबई – आर्थिक अफरातफर (मनी लाँड्रिंग)प्रकरणी अंमलबजावणी संचालनालया (ईडी)ने अटक केलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची गुरुवारी येथील शासकीय जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत असून, तेथे त्यांची चौकशी केली जात आहे. दुपारी १२च्या सुमारास देशमुख यांना दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयातून बाहेर आणले गेले. तेथून त्यांना जे. जे. रु ग्णालयात नेण्यात आले. दुपारी १२.३० ते १.३० या वेळात त्यांची नियमित तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुन्हा ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर सोमवारी रात्री उशिरा ईडीने देशमुख यांना अटक केली होती. मंगळवारी न्यायालयाने त्यांची ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली होती.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …