अनिल देशमुखांचा मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल; आज सुनावणी

मुंबई – आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अनिल देशमुख यांच्या या अर्जावर बुधवारी (५ जानेवारी) सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख सध्या आर्थर मध्यवर्ती कारागृहामध्ये आहेत. १० जानेवारीपर्यंत त्यांना कारागृहामध्ये राहावे लागणार आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी देशमुख यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली होती.
अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने पाच वेळा समन्स बजावले होते, परंतु अनिल देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या नावाने लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते, परंतु १ नोव्हेंबर २०२१ रोजी ईडीच्या कार्यालयात ते हजर झाले. त्यावेळी त्यांची १२ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांना ईडीने अटक केली.
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी ईडीने तपास करीत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सवार्ेच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे अनिल देशमुख यांना चौकशीनंतर अटक करण्यात आली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …