मुंबई - पालिका आणि शासकीय अधिकारी-कर�" />
ठळक बातम्या

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनाही दोन लस बंधनकारक : अन्यथा लोकलचे दरवाजे बंद

मुंबई – पालिका आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनाही आता लसीच्या दोन्ही मात्रा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे आता फक्त कोरोना लसीच्या दोन्ही डोस घेतलेल्या लसवंतांनाच लोकल प्रवास करता येणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्रावर मिळणारे लोकलचे तिकीट देखील बंद होण्याची चिन्हे आहेत.
अत्यावश्यक सेवेत कामआतापर्यंत त्यांनी लस घेतली आहे किंवा नाही हे न बघता रेल्वेचा पास देण्यात येत होता, परंतु आता लसीकरणाला सुरुवात होऊन बराच वेळ झालेला आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाची प्रक्रिया गतीने चालू आहे आणि लसींचा साठाही मुबलक आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील संस्थांमार्फत लसींचा पुरवठाही सुरळीत होत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेशी संबंधितांनादेखील लस अनिवार्य करण्यात आली आहे. कोरोना काळात अत्यावश्यक सेवेवर विपरित परिणाम होऊ नये, म्हणून अशा कर्मचाऱ्यांना लसीकरणातून सूट दिली गेली होती; मात्र आता लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याशिवाय रेल्वेचा पास मिळणार नाही, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली. ज्या नागरिकांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांना लोकलचा पास मिळत आहे. तर, आता अत्यावश्यक सेवेतील तसेच शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना यात सामील करण्यात आले आहे. २६ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारच्या महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून जाहीर केलेल्या परिपत्रकामध्ये लोकल दैनंदिन तिकिटाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही. परिणामी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्रावर मिळणारे लोकलचे तिकीटदेखील बंद होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …