ठळक बातम्या

अजित पवार, बनवाबनवी आणि फसवाफसवी थांबवा


मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित १ हजार ५० कोटींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्याचा दावा केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी पुन्हा एकदा अजितदादांवर निशाणा साधला. सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे हजारो कोटींहून अधिकची संपत्ती आहे. आठपेक्षा अधिक शहरांत त्यांचे बेनामी साम्राज्य पसरले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. अजित पवार लोकांना मूर्ख बनवणे थांबवा. तुमच्या कौटुंबिक मित्र कंपन्यांचे हजारो कोटींहून अधिक बेनामी आणि नामी साम्राज्य आठपेक्षा अधिक शहरांमध्ये पसरले आहे. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड ही होल्डिंग/मेन कंपनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत स्थापन केली होती. त्यासाठी १३ वर्षांपूर्वी १०० कोटी रुपये मिळाले होते, ते परत आले की, नाही? बनवाबनवी आणि फसवाफसवी थांबवा, असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …