ठळक बातम्या

१९२०२१… आजच्या तारखेवर नेटीझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

दिवस, महिना आणि वर्षाचे स्वरूप ‘१.९.२०२१’ मध्ये लिहिले असता, तारीख १९, २० आणि २१ सलग तीन संख्या देते.

अशा काही तारखा आहेत ज्या मनोरंजक असतात. या तारखा इतक्या मनोरंजक असतात की त्या लोकांना सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करण्यास प्रवृत्त करतात. आजची तारीख, १ सप्टेंबर २०२१ ही अशीच एक तारीख आहे. दिवस, महिना आणि वर्षाचे स्वरूप ‘१.९.२०२१’ मध्ये लिहिले असता, तारीख १९, २० आणि २१ सलग तीन संख्या देते – आणि यामुळे आता लोकांमध्ये उत्सुकता आहे. आणि यामुळेच यावर खूप पोस्टही सोशल मीडीयावर ट्रेंड होत आहेत.

अनेक जण सकाळपासून ट्विटरवर वेगवेगळ्या अभिरुचीच्या पोस्ट शेअर करत आहेत. काहींनी त्या दिवसाबद्दल आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी त्याचा वापर मनोरंजक पोस्ट शेअर करण्यासाठी केला. “आजची तारीख 1-9-2021 = 192021,” एक ट्विटर वापरकर्त्याने लिहिले. “आजची मनोरंजक तारीख,” दुसऱ्या वापरकर्त्याने शेअर केले. असे बरेच लोक होते ज्यांनी ट्विट केली की तारीख खरोखरच “मनोरंजक” आहे. “आज ऐतिहासिक तारीख आहे, म्हणून आज एक डेट करा.” असा जोकही एका वापरकर्त्याने केला. तर काहींनी याला क्युट तारीख असही म्हंटल आहे.

 

About admin

अवश्य वाचा

चला किल्लेदार होऊया

सर्वप्रथम सर्व वाचक, जाहिरातदार, विक्रेते आणि आमच्या हितचिंतकांना दिवाळीच्या खूप-खूप शुभेच्छा! दिवाळी ही आपली आनंदाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *