सप्टेंबर महिन्यात अजा एकादशी आणि परिवर्तिनी एकादशी या दोन महत्त्वाच्या मोठ्या एकादशी मोठ्या एकादशी आल्या आहेत.
पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तर आता सप्टेंबर महिन्यात अनेक सण आलेले आहेत. अशातच या महिन्यात सर्वात महत्वाच्या दोन मोठ्या एकादशी आल्या आहेत. पहिली एकादशी आहे ती म्हणजे अजा एकादशी आणि दुसरी म्हणजे परिवर्तिनी एकादशी. चला तर मग जाणून घेऊयात या दोन एकादशीचे महत्त्व आणि तारीख.
अजा एकादशी तारीख आणि महत्त्व
हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष एकादशीला अजा एकादशीचा उपवास केला जातो. यावेळी हा उपवास ३ सप्टेंबर २०२१ रोजी उदयतीथीच्या मूल्यासह केला जातो.
शास्त्रांमधील काही उल्लेखानुसार भाद्रपद महिन्यात येणारी ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आणि अश्वमेध यज्ञाची फळे देणारी मानली जाते. असे मानले जाते की अजा एकादशीच्या उपवासाने पुत्रावर कोणताही संकट येत नाही आणि गरिबी दूर होते. दरम्यान अजा एकादशीचे व्रत आचरणे अत्यंत शुभ आणि पुण्याचे मानले गेले आहे. या व्रताची यशस्वी सांगता करणाऱ्यांना पुण्यफलप्राप्ती होते, असे सांगितले जाते.
परिवर्तिनी एकादशी तारीख आणि महत्त्व
भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते. यंदा ही एकादशी १७ सप्टेंबर २०२१ रोजी आली आहे.
भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला भगवान विष्णू शयनावस्थेत आपली कूस बदलतात. यामुळे विष्णूंच्या स्थानात बदल होतो. म्हणून या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे संबोधले जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. परिवर्तिनी एकादशीचे व्रत केल्याने वाजपेय यज्ञाचे पुण्यप्राप्ती होते. या एकादशीला केलेल्या श्रीविष्णू पूजनामुळे मोक्षप्राप्ती देखील होते, असे सांगितले जाते. परिवर्तिनी एकादशी दिनी केलेल्या व्रतामुळे पुण्य प्राप्ती होऊन सर्व पापांचा नाश होतो, अशी मान्यता आहे.