झारखंड : महिलेची हत्या करून धडावेगळे शिर जंगलात फेकले

रांची – झारखंडमधील बोकारोजवळच्या जंगलात एका महिलेचे कापलेले शिर आढळून आल्याने खळबळ माजली आहे. बोकारोच्या सेक्टर-१२ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एकता कॉपरेटीव्हच्या बाजूच्या सतानपूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत जंगलात एका महिलेचे कापलेले शिर आढळून आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी धडाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी हे शिर ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी धडाचा शोध सुरू केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत. प्रथमदर्शनी महिलेची हत्या करून पुरावा लपवण्याच्या उद्देशाने हे शिर येथे फेकले असावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस ठाणे प्रभारी जय गोविंद गुप्ता यांनी सांगितले की, मृतदेहाजवळ एक पिशवीही सापडली आहे. या पिशवीत खून झालेल्या महिलेचे शिर येथे आणले असावे, अशी भीती व्यक्त होत आहे.
मंगळवारी सायंकाळी सतानपूर पंचायतीचे पंचायत समिती सदस्याचे प्रतिनिधी उत्तम भट्टाचार्य यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या झुडपात महिलेचे धड नसलेले शिर असल्याची माहिती पोलिसांना दिली. बुधवारी सकाळी पुन्हा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. घटनास्थळावरून एक बॅगही जप्त करण्यात आली आहे. गुप्ता यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना तसेच जवळच्या जिल्ह्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. जेणेकरून पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणी बेपत्ता महिला असल्यास त्याची माहिती मिळू शकेल. महिलेची ओळख पटवणे हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या पद्धतीने शिर मृतदेहापासून विलग आढळून आले आहे, त्यावरून तिची अन्यत्र हत्या करून ते येथे आणून टाकल्याची शंका पोलिसांनी व्यक्ती केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

३८ जणांना फाशी, ११ जणांना जन्मठेप भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी शिक्षा

३८ जणांना फाशी, ११ जणांना जन्मठेप भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी शिक्षा अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरण …