ठळक बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’वर भेट


* मनसे-भाजप युतीच्या चर्चेला उधाण
मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अमृता देवेंद्र फडणवीस, शर्मिला राज ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, ही एक कौटुंबिक भेट असल्याचेस्पष्ट करण्यात आले. ही एक कौटुंबिक भेट असल्याचे बोललेजात आहे, मात्र तसे असले तरी या भेटीला केवळ कौटुंबिक भेट बोलता येणार नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत युती तसेच विधान परिषदेच्या निवडणूकीबाबत चर्चाझाली असावी.
यापूर्वीचंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच दिवाळीमध्येभाजप आमदार आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मागील दोन ते तीन महिन्यांपासून मनसे-भाजपमध्ये युतीची चर्चा सुरु आहे. त्यातच आता फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेट दिल्यामुळे चर्चेला आणखी उधाण आले. नोव्हेंबरच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर दिवाळीमध्येराज ठाकरे आपल्या नव्या घरी शिफ्ट झाले. राज ठाकरे यांनी कृष्णकुंजच्या शेजारीच नवेघर बांधले आहे. या नव्या घरी देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आहे. या भेटीत राज्यातील परिस्थिती आणि युतीवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.
२०१९ मध्येशिवसेना आणि भाजप यांची युती तुटली. शिवसेनेनं साथ सोडल्यानंतर भाजप नव्या मित्रपक्षासोबत युती करण्यास उत्सुक आहे. भाजपा आणि मनसे युती होऊ शकते, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. या युतीचा पहिला प्रयोग मुंबई महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मराठीचा मुद्दा लावून धरणाऱ्या मनसेने गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाची वाट धरल्याचेही पाहायला मिळालं. भाजपही हिंदुत्वाच्या विचारसरणीला मानणारा पक्ष आहे. त्यामुळे हिंदुत्व दोन्ही पक्षांना जोडणार समान धागा आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं, त्यामुळे भविष्यात या दोन पक्षांमध्ये युतीची शक्यता नाकारता येत नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

वस्त्रोद्योग उत्पादनांवरील वाढीव जीएसटी रद्द करावा – अजित पवारांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

मुंबई – वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेची ४६ वी बैठक केंद्रीय अर्थमंत्री तथा जीएसटी परिषदेच्या …