कंटेनरच्या धडकेत कारचा चुराडा
एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार
सोलापूर – सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका कंटेनरची कारला धडक बसल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून, या अपघातात कारमध्ये बसलेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्युमुखी पडलेले चौघे हे लातूरमधील रहिवासी होते.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबादमधील अळणी पाटी या भागात हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर घेऊन धुळ्याच्या दिशेने जाणाºया एका कंटेनरने समोरून येणाºया कारला जोरात धडक दिली. एमएच-२४, एए-८०५५ असा या कारचा क्रमांक आहे. ही धडक इतकी भीषण होती की, त्याच्या आघातामुळे कार थेट कंटेनरच्या खालच्या भागात शिरली. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला.
या अपघातात कारमध्ये बसलेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे, तसेच एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण ही व्यक्ती नेमकी कंटेनरमधील आहे की, कारमधील याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.
अवश्य वाचा
नववर्षात १० हजार निलंबित एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार?
मुंबई – विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेली ७० दिवस चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामधील सुमारे १० हजार निलंबित …