मुंबई – एसटी महामंडळाच्या आर्थिक डबघाईचा फटका सहन करणाºया कर्मचाºयांनी आता संपाचा इशारा दिला आहे. महामंडळाचा सरकारी सेवेत समावेश करा, अशी मागणी करत १७ कामगार संघटनांच्या कृती समितीने संपाची हाक दिली़
एसटी महामंडळ कर्मचाºयांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत ‘समान काम समान वेतन’ या न्यायाने वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी एसटी कर्मचाºयांच्या मान्यताप्राप्त संघटनेने विभागीय कार्यालयांवर निदर्शने केली. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला होता. त्यानुसार हा संप पुकारण्यात येणार आहे. तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती संघटनेने दिली आहे.
दरम्यान, एसटी महामंडळामध्ये आॅक्टोबर २०१९ पासून आज अखेर १२ टक्के महागाई भत्ता सुरू आहे. राज्य शासनाने मात्र त्यांच्या कर्मचाºयांच्या महागाई भत्त्यामध्ये वेळोवेळी वाढ केली आहे, तसेच त्यांना या महिन्यापासून २८ टक्के महागाई भत्ता लागू झाला आहे. एसटी महामंडळाने १२ टक्क्यांनंतर आजपर्यंत महागाई भत्त्यामध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे दिवाळी पूर्वी थकीत महागाई भत्ता आणि आॅक्टोबर महिन्याचे वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मागणी केली आहे.
कोविडमुळे कर्मचाºयांचा पगारही वेळेवर होत नाही. परिणामी कर्मचारी कर्जबाजारी झाल्याने आतापर्यंत सुमारे २५ कर्मचाºयांनी आत्महत्या केल्या आहेत. सणासुदीच्या काळात कर्मचाºयांना उसनवारी घ्यावी लागते आहे. त्यामुळे कर्मचाºयांच्या हक्काचा महागाई भत्त्याचा फरक आणि आॅक्टोबर महिन्याचे वेतन १ नोव्हेंबर रोजीच दिवाळीपूर्वी करावे जेणेकरून कर्मचाºयांना सणासुदीची खरेदी करता येईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.